प्रत्येक गावाचे ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’ - सौरभ राव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पुणे - जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे आगामी १५ वर्षांचे व्हिजन डॉक्‍युमेंट, सात वर्षांचा रणनीती आराखडा (स्ट्रॅटेजिक प्लॅन) आणि तीन वर्षांचा कृती आराखडा (ॲक्‍शन प्लॅन) तयार करण्याचा आदेश नीती आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. हे नवे डॉक्‍युमेंट आणि आराखडे तयार करण्यासाठी येत्या प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे गावांचा शाश्‍वत विकास होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी सांगितले.

याबाबतचे नीती आयोगाचे पत्र गुरुवारीच पुणे जिल्हा प्रशासनाला मिळाले. गावपातळीपासून देशपातळीपर्यंत म्हणजेच गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे स्वतंत्र डॉक्‍युमेंट तयार केले जाणार आहेत. त्यानंतर सर्व राज्यांच्या डॉक्‍युमेंटचे मिळून देशाचे स्वतंत्र व्हिजन डॉक्‍युमेंट तयार करण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. 

जिल्हाधिकारी राव म्हणाले, ‘‘त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार गावांच्या विकासासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यातूनच पंचायतराज संस्थांना (ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद) अधिकाधिक अधिकार देण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करण्यात येऊ लागला आहे. गावांच्या विकासासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागल्याने, या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या उद्देशाने हे ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’ तयार केले जात आहे.’’ 

दरम्यान, आतापर्यंत केवळ गावांच्या विकासाचा कृती आराखडा तयार केला जात असे. त्यात आता स्ट्रॅटेजिक प्लॅन आणि व्हिजन डॉक्‍युमेंटची भर पडणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ४०८ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतीचे व्हिजन डॉक्‍युमेंट तयार केले जाणार आहेत. त्यासाठी येत्या २६ जानेवारीला खास याच विषयावर ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांसाठी सरकारी प्रतिनिधीही पाठविण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.

गावांचे १५ वर्षांनंतरचे चित्र
नव्याने तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यात आगामी तीन वर्षांत केल्या जाणाऱ्या विकासकामांचे नियोजन, रणनीती आराखड्यात गावांच्या विकासासाठी आगामी सात वर्षांत आखण्यात येणारी ध्येय-धोरणांची रणनीती आणि व्हिजन डॉक्‍युमेंटमध्ये आगामी १५ वर्षांनंतर गावाचा विकास कसा झालेला असेल, याचे नियोजन करण्याचे सुचविण्यात आले आहे.

Web Title: any village vision document