‘एनीडेस्क’ डाउनलोड करताना घ्या काळजी

Reserve-Bank-of-India
Reserve-Bank-of-India

पुणे - मोबाईल, नेट बॅंकिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी कोणतेही ॲप डाउनलोड करताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत. प्लेस्टोर आणि ॲपस्टोरमधील ‘एनीडेस्क’ यांसारखे ॲप डाउनलोड केल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या बॅंक खात्यातून पैसे चोरीस जाऊ शकतात. 

रिझर्व्ह बॅंकेने १४ फेब्रुवारी रोजी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, ‘यूपीआई’ आणि मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसोबत फसवणुकीच्या घटना घडत आहेत. याबाबत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. 

‘एनीडेस्क’ किंवा एखादे ॲप डाउनलोड करण्याचे आमिष दाखवले जाते. ॲप डाउनलोड झाल्यानंतर नऊ अंकी पासवर्ड दिला जातो. फसवणूक करणाऱ्या व्यक्‍तींकडून या पासवर्डची मागणी केली जाते. तो पासवर्ड दिल्यानंतर हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगार त्यांच्याकडील मोबाईलमधील ॲपमधून तुमच्या बॅंक खात्यातील रक्‍कम चोरी करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com