आपटळे-घाटघर रस्त्यावरील मोरीच्या भरावाचे काम पूर्ण  

दत्ता म्हसकर 
मंगळवार, 10 जुलै 2018

जुन्नर - आपटळे-घाटघर रस्त्यावरील फांगुळगव्हाण ता.जुन्नर येथील मोरीचा खचलेला भराव रविवारी (ता.08) रोजी मुरूम टाकून भरण्यात आला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता युवराज मळेकर यांनी माहिती दिली. 

ई-सकाळ आणि सकाळमध्ये शुक्रवारी व शनिवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत रविवारी भर पावसात ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करून घेण्यात आले. यामुळे परिसरसतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

घाटघर ग्रामपंचायत सदस्य नंदू पानसरे यांनी सांगितले की, रस्त्याचा हा भाग खाली असल्याने सर्व बाजूने वाहत येणारे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. डोंगर उतारावरून वेगाने पाणी वाहत येत असल्याने पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे भराव खचला. पावसाचा जोर कायम राहिला तर रस्ता व मोरी वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. येथे मोठ्या पुलाची गरज असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच फांगुळगव्हाण ते घाटघर हा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीस निरुपयोगी झाला आहे. नाणेघाट येथे येणारे पर्यटक देखील या रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त करतात रस्त्याचे किमान खडीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Apetale-Ghatghar street work complited