निर्यातक्षम शेवगा उत्पादन तंत्र 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे  - बांधावरचे पीक म्हणून ओळख असलेल्या भारतीय शेवग्याला स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम शेवगा उत्पादन, निर्यातीच्या संधी यांबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) होत आहे. कमी पाण्यात, कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवग्याच्या जातींची ओळख, छाटणीचे व्यवस्थापन, देशनिहाय निर्यातीचे नियम आदींसंदर्भात निर्यातदार तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार तीनशे रुपये. 
संपर्क - 8605699007 
--------------------------------- 
रेशीम शेती उद्योगाविषयी कार्यशाळा 

रेशीम शेतीतील संधी व फायदे, व्यवस्थापन, कोषांसाठी बाजारपेठ, मार्केटिंग, रेशीम सूतनिर्मिती, मूल्यवर्धन, शासनाचे अनुदान आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची रेशीम शेती कार्यशाळा 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. रेशीम संचालनालयाच्या पुणे जिल्हा रेशीम कार्यालयाचे तंत्र अधिकारी मार्गदर्शन करतील व यशस्वीपणे रेशीम शेती करणारे शेतकरीही त्यांचे अनुभव सांगतील. रेशीम शेतीला भेट देण्याचेही नियोजन आहे. प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार तीनशे रुपये. 
संपर्क : 8605699007 
-------------------------- 
शिकून घ्या टॅक्‍स प्लॅनिंग 
आर्थिक वर्षातले तसेच भविष्यातील कमी व दीर्घ कालावधीचे कर नियोजन, वैयक्तिक व व्यवसायाच्या प्राप्तिकराचे विवरण, धोरणात्मक दृष्टीने करांचे नियोजन, गृह व शैक्षणिक कर्ज, पीएफ आदी गुंतवणुकींमुळे करात मिळणारे फायदे, संपत्ती करासंदर्भात नियोजन आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. 24) होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार दोनशे रुपये. 
संपर्क : 8669689020 
------------------------ 
वेदिक मॅथ्स अभ्यासक्रम 
गणिते जलद सोडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेदिक मॅथ्स तंत्राविषयी दहा दिवसांचा अभ्यासक्रम शनिवारपासून (ता. 24) सुरू होत आहे. यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, बीजांक आदींचा समावेश असेल. बारा वर्षांवरील कोणीही यात सहभागी होऊ शकेल. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार पाचशे रुपये. 
संपर्क : 9130070132 
--------------------------- 
प्रोजेक्‍ट रिपोर्ट रायटिंग कार्यशाळा 
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल बनविणे महत्त्वाचे आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रोजेक्‍ट रिपोर्ट रायटिंगविषयी मूलभूत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. 25) होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार दोनशे रुपये. 
संपर्क : 8669689020 
-------------------------- 
(सर्व प्रशिक्षणे, कार्यशाळा एपीजी लर्निंग, सकाळ नगर, बाणेर रस्ता, पुणे येथे होतील.)

Web Title: APG Learning Training CENTER