Apmc Election Result : मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व, १८ पैकी १७ जागांवर विजय

भाजप प्रणित सर्वपक्षीय पॅनेलचा दारुण पराभव झाला.
मावळ
मावळsakal

वडगाव मावळ : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले व बाजार समिती पुन्हा ताब्यात घेतली. भाजप प्रणित सर्वपक्षीय पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यांना अवघी एक जागा मिळाली. निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण असलेल्या सात, महिला मतदार संघातील दोन, ओबीसी व भटक्या विमुक्तची प्रत्येकी एक अशा सर्व ११, ग्रामपंचायत मतदार संघातील सर्व चार , व्यापारी मतदार संघातील एक व हमाल, तोलारी मतदार संघातील एक अशा एकूण १७ जागांवर विजय मिळवला. भाजप प्रणित पॅनेलला व्यापारी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल व भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेल या दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाल्याने निकाला बाबत मोठी उत्सुकता होती. मतमोजणीला निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी नऊ वाजता येथील पंचायत समितीच्या सभागृहात सुरूवात झाली.

सुरुवातीला कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण असलेल्या सात जागांची मतमोजणी करण्यात आली. या सातही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतर महिला मतदार संघातील दोन जागांची मतमोजणी झाली. त्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीच्याच उमेदवारांनी बाजी मारली.

त्यानंतर इतर जागांची मतमोजणी झाली. दुपारी दोन वाजता सर्व जागांची मतमोजणी पूर्ण झाली. महाविकास आघाडीने १८ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले व बाजार समिती पुन्हा ताब्यात घेतली. निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. आमदार सुनील शेळके यांच्यासह सर्व पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते. मावळच्या जनतेने विकासाला साथ देत महाविकास आघाडीला मोठा विजय प्राप्त करून दिला असून यापुढील काळातही विकासाला अशीच साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - सर्वसाधारण कृषी पतसंस्था मतदार संघ -दिलीप नामदेव ढोरे, संभाजी आनंदराव शिंदे, सुभाष रघुनाथ जाधव, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, मारुती नाथा वाळुंज, साईनाथ दत्तात्रय मांडेकर, कृषि पतसंस्था महिला - सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभुळकर, कृषि पतसंस्था इतर मागास वर्ग- शिवाजी चिंधु असवले, ग्रामपंचायत सर्वसाधारण - नामदेव नानाभाऊ शेलार, विक्रम प्रकाश कलवडे, अनुसूचित जाती -विलास बबन मानकर, आर्थिक दुर्बल घटक -अमोल अरुण मोकाशी, भटक्या विमुक्त जमाती- नथु शंकर वाघमारे, व्यापारी सर्वसाधारण- भरत दशरथ टकले, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे, हमाल तोलारी सर्वसाधारण- शंकर अंतू वाजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com