केंद्र शासनाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी आवाहन

संदीप जगदाळे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

हडपसर - केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणा-या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे अर्ज www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपल्बध आहेत.

हडपसर - केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणा-या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे अर्ज www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपल्बध आहेत. सदर प्रस्ताव 14 ऑगस्ट पर्यंत जिल्हा समजकल्याण कार्यालयात सादर करावेत, असे अवाहन जिल्हा समाजकल्याण  अधिाकारी दिपक चाटे यांनी केले आहे.  

सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी, दिव्यांग व्यक्तींच्या नियुक्तीसाठी कार्य करणा-या यंत्रणा या प्रकारच्या पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडून परस्कार न मिळालेल्या व्यक्ती/ संस्थाची राज्य शासनाच्या अपंग व्यक्ती राज्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येईल.

केंद्र शासनाकडून दिल्या जाणा-या पुरस्कारांच्या 14 प्रकारामध्ये उत्कृष्ट कर्मचारी स्वंयउद्योजक दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा-यया उत्कृष्ट संस्था. प्रतीथ यश दिव्यांग व्यक्ती,  दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेल उत्कृष्ट संशोधन/ उत्पादन/ निर्मीती, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहित ववातावरण निर्मीती करणारे कार्यालय/ संस्था, दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडोळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणा-या प्रौढ दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहीत करणारे उत्कृष्ट राज्य, क्रीडा क्षेत्रात कारर्य करणारी दिव्यांग व्यक्ती यांचा समावेश आहे.

Web Title: Appeal for registration for an award the Central Government's