वयोश्री योजनेेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

राजकुमार थोरात 
मंगळवार, 20 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या वयोश्री योजनेेचा जास्तीजास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र शासनाच्या माध्यामातुन पुणे जिल्हातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना राबविण्यास सुरवात केली आहे. या योजनेतंर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्वाची तपासणी करुन ज्येष्ठांना तपासणीनूसार चालण्याची काठी, आधार काठी, तिपाई काठी, चष्मे, एेकण्याचे यंत्र, स्वयंचलित कृत्रिम दांडी, चाकाची खुर्ची मोफत देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी आज मंगळवारी (ता.२०) पासुन सुरवात झाली अाहे. २१ मार्चला हवेली, २२ मार्च रोजी पुरंदर, २३ मार्च रोजी बारामती, २४ मार्च रोजी इंदापूर, २५ मार्च रोजी दौंड,२६ मार्च रोजी भोर, २७ मार्च रोजी वेल्हा, २८ मार्च रोजी मुळशी येथे सकाळी १० ते ६ वेळेमध्ये होणार असल्याचे माने यांनी सांगितले.

तपासणीसाठी येताना आधारकार्ड गरजेचे अाहेत. तसेच खालील दाखल्यापैकी एक दाखला गरजेचा अाहे. ग्रामसभेतील गरीबातील गरीब दाखला, एक लाखा पेक्षा कमी उत्पन्न असणारा तहसीलदारचा दाखला, प्रधानमंत्री आवाज योजनेचा लाभार्थी असलेला दाखला, जिल्हाधिकारी मार्फत असलेल्या इंदिरा गांधी पेन्शन लाभार्थी योजनेचा दाखला, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला असावा.

Web Title: appeal for vayoshri scheme for senior citizens