शिर्सुफळ जिल्ह्यातील ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी अर्ज दाखल

संतोष आटोळे
बुधवार, 9 मे 2018

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आज अखेर वेल्हे, भोर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यांमधुन एकही अर्ज दाखल झाला नाही. तर पुरंदर मधुन पाच, दौंड एक, बारामती दोन, इंदापूर तीन, जुन्नर तीन, खेड सहा, शिरुर सहा असे एकुण 26 अर्ज दाखल झाले आहेत.

शिर्सुफळ - जिल्ह्यातील जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या एकुण 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) रोजी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसा अखेर सरपंचपदासाठी 26 तर सदस्य पदासाठी 77 अर्ज दाखल झाले आहेत. तर 258 ग्रामपंचायतीच्या 456 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी 3 तर सात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.शनिवार (12 मे) पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आज अखेर वेल्हे, भोर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यांमधुन एकही अर्ज दाखल झाला नाही. तर पुरंदर मधुन पाच, दौंड एक, बारामती दोन, इंदापूर तीन, जुन्नर तीन, खेड सहा, शिरुर सहा असे एकुण 26 अर्ज दाखल झाले आहेत. सदस्य पदासाठी वेल्हे, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यांमधुन एकही अर्ज दाखल झाला नाही तर भोर मधुन चार, पुरंदर मधुन सतरा, दौंड एक, बारामती नऊ, इंदापूर नऊ, जुन्नर चौदा, खेड आठ, शिरुर पंधरा असे एकुण 77 अर्ज दाखल झाले आहेत. तर पोटनिवडणुकांमध्ये सात गावांच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही तर सदस्य पदासाठी फक्त बारामती मधुन तीन अर्ज दाखल झाले आहेत. इतर ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही. शनिवार (12 मे) पर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 

निवडणुका होत असलेला तालुका, ग्रामपंचायत संख्या 
वेल्हा - 1, मावळ - 7, भोर - 6, जुन्नर - 3, मुळशी - 1, पुरंदर - 13, खेड - 13, आंबेगाव - 10, बारामती - 15, शिरुर - 6, इंदापूर - 5, दौंड - 10
एकुण - 90 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Application for Sarpanch and Member position in Gram Panchayat elections in Shirusofal district