बारामतीत भाजपच्या महिला खासदाराविरोधात पोलिसांत अर्ज दाखल

मिलिंद संगई
Wednesday, 23 December 2020

खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात बारामतीत अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना अर्ज देण्यात आला आहे.

बारामती : खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात बारामतीत अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना अर्ज देण्यात आला आहे. बारामतीतील सीआर संघटनेचे उपाध्यक्ष चेतन कुचेकर यांनी हा अर्ज दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

12 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशातील सिहोर येथे आयोजित एका संमेलनात त्यांनी चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन करताना चार वर्गांचा हवाला दिला होता. हे वक्तव्य करताना त्यांनी जी शब्दरचना सार्वजनिक ठिकाणी वापरली त्या मुळे दलित समाजाचा अपमान झाला आहे, त्यांचे वक्तव्य जातीयवादाला खतपाणी घालणारे असून राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारे असल्याचे या बाबतच्या अर्जात नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर खासदार आहेत,  त्यांचे अनुकरण व समर्थन करणारे अनेक लोक आहेत. त्यांनी जर असे वक्तव्य केले तर याचा परिणाम समाज व्यवस्थेवर होऊ शकतो.

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्य  वक्तव्याचा  व्हिडिओ कुचेकर यांनी 19  डिसेंबर ला एएनआय या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर पाहिला आहे, या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ व बातमी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरही अपलोड केली आहे.  या तक्रारीचा गांभीर्याने विचार करून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर कायद्यांनुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी चेतन कुचेकर यांनी केलेली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: application was filed with the police against a BJP woman MP