पीएमपीकडून दिले जाणार विद्यार्थ्यांना पास; अर्जांचे वाटप सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच मान्यता प्राप्त खासगी शाळेतील विद्यार्थांना 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी पीएमपीकडून पास दिले जाणार आहेत. त्यासाठीच्या अर्जवाटप प्रक्रियेला सुरवात झाली आहे. पीएमपीच्या सर्व पास केंद्रातून अर्जांचे वाटप होणार आहे. 

पीएमपीने दोन्ही शहरांतील या विद्यार्थ्यांसाठी महापालिका अनुदानित पास योजना राबवीत आहे. पीएमपीला येणारा खर्च दोन्ही महापालिकांकडून दिला जातो. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवस शिल्लक राहिल्याने पीएमपीकडून ही योजना राबविण्यात आली आहे. शहरातील शाळेच्या प्रतिनिधी किंवा शाळा प्रमुखांनी एकत्रित अर्ज मागितल्यास पीएमपीच्या सर्व आगारांमधून ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांना पास केंद्रावर येण्याची गरज भासणार नाही. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पासची 25 टक्के रक्कम चलनाद्वारे भरावी लागणार आहे, असे प्रशासनाने कळवले आहे. 

पासवाटप 17 जूनपासून 
या पासची वितरण व्यवस्था दोन्ही महापालिकांच्या सर्व आगारांमधून 17 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांनी योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Applications are allocated to the student bus pass by PMP