
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबत डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयास दिली जाईल.
पुणे : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीबाबत महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना येत्या 15 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी पार पडली कोरोनाची 'ड्राय रन'!
महाडीबीटी पोर्टलद्वारे अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर थेट वितरीत करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना योजनांचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी करावी. तसेच, पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त यांच्याकडे ऑनलाइन पाठवावेत.
- Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबत डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयास दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. तसेच, अनुसूचित जातीच्या कोणत्याही विद्यार्थ्याची पिळवणूक होऊ नये, याबाबत आवश्यक खबरदारी शैक्षणिक संस्थांनी घ्यावी, असे आदेश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
संकेतस्थळ - https://mahadbtmahait.gov.in
अडचण आल्यास टोल क्रमांक - 022-49150800
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)