सदनिकेतील बदलाबाबत आता पालिकेकडे अर्ज करता येणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - सोसायटीतील सदनिकेमध्ये बदल केल्यानंतर तो नियमित करण्यासाठी संबंधितांना आता महापालिकेकडे अर्ज करता येणार असून, त्यासाठी नवी नियमावली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर ती अमलात येणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकांना सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) गरज राहणार नाही. त्यामुळे सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. 

विविध शहरांमधील 31 डिसेंबर 2015 पूर्वी करण्यात आलेली बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला असून, ठराविक दंड आकारून ती नियमित करता येणार आहेत. दंड भरून त्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत शंभर प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम खात्याकडे आले आहेत. त्यातील 20 प्रस्ताव मार्गी लावल्याचे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी मंगळवारी सांगितले. 

सदनिकेत बदल केल्याने ते नियमित करण्याबाबत प्रस्ताव येत आहेत. नियमांनुसार एखाद्या सदनिकेतील बांधकाम नियमित करण्यासाठी संबंधित सोसायटीच्या एनओसीची आवश्‍यकता आहे. मात्र, अशा प्रकरणांमध्ये सोसायट्यांकडून एनओसी मिळत नाही, त्यामुळे संबंधित सदनिकाधारकांची अडचण होते. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आता सोसायटीऐवजी महापालिकेकडे अर्ज करता येणार आहे. 

पाच महिन्यांत दाखल प्रस्ताव 100 
एकूण मार्गी लागलेले प्रस्ताव 20 

Web Title: Applying for change in the Flat to the Municipal Corporation

टॅग्स