पुणे : पाणी पुरवठा योजनेसाठी सल्लागार नियुक्त

समान पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे : महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेचा पहिलेचा सल्लागार काम सोडून गेल्यानंतर आता दुसरा सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. योजनेचे उर्वरित ५० टक्के काम पूर्ण करण्यासाठी या सल्लागारास १८ कोटी ८५ लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे.

महापालिकेने शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासाठी २०११ मध्ये एसजीआय ही इटलीची कंपनी नियुक्त केली होती. या कंपनीसोबत १० वर्षाचा करार करण्यात आला होता. या २१०० कोटी रुपयांच्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम चार वर्षापूर्वी सुरू झाले होते. २०१७ ते २०२१ पर्यंत योजनेचे ४० टक्के काम पूर्ण झाले होते. हे काम संथ गतीने सुरू असल्याने महापालिकेने सल्लागारास नोटीस बजावली होती. तसेच १० वर्षाचा करार संपल्याने या कंपनीने त्यानंतर त्यांनी पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविली.

या काळातील काम केल्याने सल्लागारास सुमारे ९ कोटी रुपये शुल्क दिले आहे. तर अद्यापही काही रक्कम महापालिकेने दिलेली नाही. उर्वरित काम करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली होती. त्यामध्ये वॉटर ऍड पॉवर कन्सलटंन्सी सर्विसेस ही कंपनी पात्र झाली आहे. यासाठी १८ कोटी ८५ लाख रुपयांचे शुल्क दिले जाणार आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘समान पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम एका वर्षात पूर्ण केले जाणार आहे. पूर्वीच्या सल्लागाराने काम सोडल्याने नव्याने सल्लागार नियुक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com