दौंड : वरवंडपर्यंतच्या पीएमपीएल सेवेस मंजूरी

दौंड : वरवंडपर्यंतच्या पीएमपीएल सेवेस मंजूरी

वरवंड ः पीएमपीएलची बस सेवा वरवंड (ता. दौंड) पर्यंत सुरु करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले. पीएमपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हडपसर ते वरवंड अशा पीएमपीएल बससेवेस गुरुवारी (ता. १७) मंजूरी दिली. येत्या वीस तारखेपासून वरवंडपर्यंत ही बस सेवा सुरु होणार असल्याची माहिती पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

दौंड : वरवंडपर्यंतच्या पीएमपीएल सेवेस मंजूरी
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विस्तार वाढणार?

दौंड तालुक्यातील यवतपर्यंत पीएमपीएलची बस सेवा सुरु होती. मात्र, तालुक्यात वरवंड हे शैक्षणिक दृष्टया महत्वाचे गाव मानले जाते. या ठिकाणी फार्मसी महाविदयालय, विविध शाखेतील पदवीची महाविदयालये, शाळा, जिल्हा परीषद शाळा आदींचा समावेश आहे. तसेच महानंद दुध भुकटी प्रकल्प, जिल्हा दुध उत्पादक संघ, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बॅंका, पोस्ट कार्यालय, जिल्हा दुध केंद्र, आठवडे बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय, निमशासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे याठिकाणी लोकांची मोठी वर्दळ असते. यामुळे बससेवा ही वरवंड पर्यंत सुरु करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणी करत होते. या संदर्भात ग्रामसभेतही ठराव करण्यात आला. ग्रामपंचायत,व्यापारी संघ आदींनी वरिष्ठ कार्यालयात निवेदन दिले होते. दरम्यान, हडपसर ते वरवंड यासाठी सध्या पाच बसचे नियोजन करण्यात आले आहे. दर पाऊणतासाने ही बस धावणार आहे, अशी माहिती अधिकारी दत्तात्रेय झेंडे यांनी दिली. याबाबत सरपंच मिना दिवेकर व उपसरपंच प्रदिप दिवेकर म्हणाले, ''पीमपीएलच्या बससेवेमुळे गावला वेगळे महत्व प्राप्त होणार आहे. तसेच गावातील नागराकांना पुण्याला ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे.

दौंड : वरवंडपर्यंतच्या पीएमपीएल सेवेस मंजूरी
पुणे ‘ग्लोबल मेयर्स’च्या अंतिम फेरीत; जगातील 631 महापौरांमधून निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com