एप्रिलफूलच्या भानगडीत पडू नका..अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल

मिलिंद संगई
Monday, 30 March 2020

एप्रिल फूलच्या निमित्ताने 1 एप्रिल रोजी कोरोनाबाबत अफवा पसरविणा-या किंवा लोकांच्या अडचणी वाढतील अशा मेसेज टाकणा-यांवर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.

बारामती - एप्रिल फूलच्या निमित्ताने 1 एप्रिल रोजी कोरोनाबाबत अफवा पसरविणा-या किंवा लोकांच्या अडचणी वाढतील अशा मेसेज टाकणा-यांवर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात प्रसिध्दीपत्रकात शिरगावकर यांनी नमूद केले आहे की, 1 एप्रिल रोजी एप्रिल फुल निमित्त नागरिकांकडून वेगळ्या प्रकारचे  मेसेज एप्रिल फूल बनवण्याकरता (जमावबंदी उठले आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे ) अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमातून लोकांची जनजागृती करून असे स्वरूपाचे मेसेज व्हायरल होता कामा नये याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकाकडून सोशल मीडियावर व्हारल झाल्यास  व्हायरल करणाऱ्यावर त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल होतील. ग्रुप ॲडमिनने आत्ताच आपल्या ग्रुपमधील  सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंग मध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे, असे शिरगावकर यांनी नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: April Full Rumor coronavirus police crime