सिक्युरिटी व अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे : आज सकाळी साडेदहा वाजता कोंढवा, लुल्लानगर चौकात असणाऱ्या माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीमधे सहाव्या मजल्यावर एका फ्लॅटमधे आग लागल्याची घटना घडली. तेथील सिक्युरिटी इनचार्ज विलास पाटील व सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांच्या वेळीच लक्षात आल्याने फ्लॅटमधील दोघांना सुखरुप बाहेर पडता आले. 

या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन प्रचंड धूर येत असल्याचे एका ऑफिस बॉयने आम्हाला सांगताच अत्तार व पाटील दोघे वर धावत जाऊन त्यांनी बाहेर हॉलमधे आग लागल्याचे पाहिले. फायर एक्टिंगविशरच्या साह्याने आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याने आग आटोक्यात सेत नाही हे पाहून अग्निशमन दलाला कळविले व फ्लॅटमधील दोन जणांना घराबाहेर घेतले. पुन्हा बिल्डिंगमधे सुस्थितीत असणाऱ्या होजचा वापर करुन आगीवर पाणी मारत असताना अग्निशमन दलाचे जवान ही पोहोचले.

जवानांनी हॉलमधील सर्व साहित्याने पेट घेतल्याने तातडीने पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली. तसेच कोणी जखमी नाही याची खात्री करुन प्रसंगावधान दाखवणाऱ्या लुंकड रियाल्टी सिक्युरिटीचे इनचार्ज विलास पाटील व सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांचे कौतुक ही केले. तसेच सिक्युअर सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या टिमने मदत केल्याबद्दल त्यांचे ही आभार मानले.

आगीमुळे फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉलमधील साहित्य पुर्ण जळाल्याचे व आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून सांगण्यात आली. या कामगिरीमधे कोंढवा अग्निशमन केंद्राचे तांडेल दिलिप बिबवे, चालक सचिन चव्हाण, जवान सुभाष खाडे, सागर दळवी तसेच क्विक रिस्पान्स टिमचे निलेश राजीवडे, हर्षद येवले, अनिकेत गोगावले, मनोज भारती यांनी सहभाग घेतला

Web Title: The aptnessof the security and fire fighting jaw was avoided; Fire control