स्थापत्य अभियंत्यांनी कौशल्य वाढवावे - डॉ. सुनील कुटे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - देश बदलतोय, त्याप्रमाणे आधुनिक विकासाच्या दिशा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचे आयामही बदलत आहेत. त्यामुळे भविष्यात स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम व्यावसायातील नवनवी कौशल्ये व नवे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन सिव्हिल इंजिनिअर अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ. सुनील कुटे यांनी व्यक्त केले. 

‘सकाळ प्रकाशन’तर्फे आयोजित लेखक प्रकाश मेढेकरलिखित ‘दिशा बांधकाम नवनिर्मितीची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिक सतीश मगर, ‘सकाळ प्रकाशन’च्या संपादिका ऐश्‍वर्या कुमठेकर आदी उपस्थित होते. 

डॉ. कुटे म्हणाले, ‘‘बदलत्या काळानुसार नागरिकीकरणही वाढत आहे. शहरातील मध्यमवर्गीयांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. त्यामुळे निवारा उपलब्ध करून देणाऱ्या बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाली आहे; मात्र सिव्हिल इंजिनिअरिंगचे (स्थापत्य अभियांत्रिकी) मापदंड बदलू लागलेत. राज्यात २४७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. दरवर्षी वीस हजारांहून अधिक इंजिनिअर येथून शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. या तरुण अभियंत्यांसाठी मेढेकर यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे.’’

मगर म्हणाले, ‘‘शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक ज्ञान यामध्ये सध्या तफावत जाणवते. बांधकाम साहित्य, बदलते तंत्रज्ञान, नदीतला राडारोडा, मशिनरी याविषयीची अर्थपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने स्तुत्य आहे. या पुस्तकाचे इंग्रजी भाषेतही भाषांतर व्हावे. तंत्रज्ञान बदलत असून, ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.’’ 

कुमठेकर म्हणाल्या, ‘‘बांधकाम विश्‍वातील नवीन माहिती देणारे हे पुस्तक आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांसह सर्वसामान्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे.’’ दयानंद घोटकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Architectural engineers should increase skills