तुमची मुलं क्लासला जातात? ती सुरक्षित आहेत का?

शनिवार, 25 मे 2019

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने शहरात खासगी क्‍लासची संख्या मोठी आहे. नावाजलेले काही क्‍लास वगळता अन्यत्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची किती खबरदारी घेतली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

पुणे : गुजरातमध्ये आग लागल्याने खासगी क्‍लासला गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 जणांचा होरपळून मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यातील क्‍लासमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा प्राधान्यक्रम असला पाहिजे.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने शहरात खासगी क्‍लासची संख्या मोठी आहे. नावाजलेले काही क्‍लास वगळता अन्यत्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची किती खबरदारी घेतली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. क्‍लासचे नियमन करण्यासाठी शिक्षण विभागाने कायदा तयार केला होता; परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सुरक्षेचे नियम किती पाळले जातात, हे तपासण्याची कोणतीही व्यवस्था निर्माण झालेली नाही. 

क्लास निवडताना पालक म्हणून आपण काय पाहतो, याचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are Classes and Educational Institutions safe for students