esakal | Vidhan Sabha 2019 : मोदींच्या सभेसाठी पुण्यात येताय? इथे आहे पार्किंगची सोय
sakal

बोलून बातमी शोधा

PMO Narendra Modi in pune

Vidhan Sabha 2019 : मोदींच्या सभेसाठी पुण्यात येताय? इथे आहे पार्किंगची सोय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 :  पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतूकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. वाहनतळ व्यवस्था देखील केली आहे. त्याबाबत पुणे वाहतूक पोलिसांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच वाहतूकीतील बदल आणि सद्यस्थितीबाबत ऑनलाईन दिली आहे. 


नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. गुरुवारी दुपारी 12 ते रात्री 12 या वेळेत स. प. महाविद्यालय व परिसरातील वाहतूक आवश्‍यकतेनुसार वळविली जाईल. तसेच वाहतूकीतील बदल आणि सद्यस्थितीबाबत ऑनलाईन दिली आहे. 

टिळक व शास्त्री रस्ता "नो पार्किंग'
शास्त्री रस्ता, टिळक रस्त्यावरील पार्किंग दुपारी 12 ते रात्री 12 या वेळेसाठी रद्द केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी संबंधित रस्त्यावर वाहने लावू नयेत. दुपारी बारापासून या बदलाची अंमलबजावणी केली जाईल. पोलिसांकडून वेळ व गर्दी लक्षात घेऊन वाहतूकीत बदल केले जातील.

इथे करा पार्किंग
सभेसाठी येणाऱ्यांसाठी संयोजकांनी दहा ठिकाणी पार्किंग केली आहे. त्यामध्ये गणेश कला क्रीडा, न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, रमणबाग, न. रा. हायस्कूल यासह अन्य ठिकाणी पार्किंग करता येईल. नागरिकांनी सभास्थळी येताना खासगी वाहने टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पुढील दहा ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था 
विश्रामबाग
१ नदीपात्र रस्ता
२ रेणुका स्वरुप शाळा
३ महाराष्ट्रीय मंडळ
४ न्यू इंग्लिश स्कूल
५ सणस मैदान
६ मुक्तांगण शाळा
 स्वारगेट
७.कटारिया स्कूल
८. नेहरू स्टेडियम
 खडक
९.स्काऊट ग्राउंड
१०. डेक्कन गरवारे कॉलेज

loading image
go to top