इथं झाला तीन किलोमीटरचा परिसर सील...

प्रा. प्रशांत चवरे
Wednesday, 29 April 2020

- भिगवण स्टेशनपासून तीन किलोमीटर परिसर सील : भरणे

भिगवण : इंदापूर तालुक्यामध्ये पहिला कोरोना रुग्ण भिगवण स्टेशन येथे आढळून आल्यानंतर प्रशासनाने भिगवण स्टेशन, भिगवण, डिकसळ, तक्रारवाडी (ता.इंदापूर) हा तीन किलोमीटरचा परिसर सील केला आहे. लोकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घ्यावी व प्रशासनास योग्य माहिती द्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी (ता.२८) भिगवण स्टेशन येथील महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, तहसिलदार सोनाली मेटकरी, तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, डॉ. अमित उदावंत, भिगवणच्या सरपंच अरुणा धवडे उपस्थित होते. यावेळी ना. भरणे म्हणाले, प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे.

Seak Road

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भिगवण स्टेशनपासून तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून, या भिगवण स्टेशन, भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा यांच्या माध्यमातून या भागाचे संपु्र्ण सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अत्यावश्यक सेवेमध्ये केवळ वैद्यकिय सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. घरात थांबून सहकार्य करावे. बैठकीमध्ये नागरिकांचे सर्व्हेक्षण, अत्यावश्यक सेवासंबधी रुपरेषा, अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आदीविषयी दिशा ठरविण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Area of 3 KM seal in Bhigwan