esakal | Fight With Corona : छोट्यांची 'खरी कमाई' मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun and Arnav two brothers gave their income to the Chief Minister aid fund

सहकारनगर येथे रहाणारा अर्जुन सदलगे हा पाचवीत, तर त्याचा लहान भाऊ अर्णव हा पहिलीत अक्षरनंदन शाळेत शिकत आहेत. हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीमध्ये कुंभारवाडा येथून पणत्या आणून त्यांच्या सोसायटीच्या परिसरात विक्री करतात. विक्रीतून जमा झालेला पैसे पुन्हा पुढच्या वर्षी पणती खरेदीसाठी वापरतात. यंदा त्यांनी ९०० रुपयांची कमाई केली होती. ​

Fight With Corona : छोट्यांची 'खरी कमाई' मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Fight With Corona : पुणे : "आपण रोज पोटभर जेवत आहोत, पण अनेक जण लाॅकडाऊनच्या काळात उपाशी रहात आहेत. यांच्यासाठी आपण काय करू शकू का?" अशी सामाजिक संवेदना जागृत करणारा प्रश्न शाळेत जाणाऱ्या अर्जुन आणि अर्णव या दोघा भावांना पडला. या दोघांनी दिवाळीत पणत्या विकून ९०० रुपये जमवले होते. ही 'खरी कमाई' त्यांनी थेट मुख्यमंत्री सहायता निधीत (सीएम फंड) जमा केलीच, शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मदत स्विकारण्याची विनंती केली. 

सहकारनगर येथे राहणारा अर्जुन सदलगे हा पाचवीत, तर त्याचा लहान भाऊ अर्णव हा पहिलीत अक्षरनंदन शाळेत शिकत आहेत. हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीमध्ये कुंभारवाडा येथून पणत्या आणून त्यांच्या सोसायटीच्या परिसरात विक्री करतात. विक्रीतून जमा झालेला पैसे पुन्हा पुढच्या वर्षी पणती खरेदीसाठी वापरतात. यंदा त्यांनी ९०० रुपयांची कमाई केली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लाॅकडाऊन मध्ये अनेकांची उपासमार होत आहे, त्याच्या बातम्या, फोटो वृत्तपत्रात छापून येत आहेत. तसेच अनेक जण सरकारला निधी देऊन हातभार लावत आहेत. मंगळवारी दुपारी घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असताना अर्जून आणि अर्णव या दोघांनी आपण या गरजवंतांना काही मदत करू शकतो का असे त्यांचे बाबा निखील सदलगे यांना विचारले. त्यांनी तुम्ही 'मुख्यमंत्री सहायता निधीत' पैसे जमा करून मदत करू शकता असे त्यांना सुचविले. त्यानंतर या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता पणत्या विक्रीतून आलेले ९०० रुपये या निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. निखील सदलगे यांनी ९०० रुपये ऑनलाईन हे पैसे जमा केले. तसेच अर्जुनने मुख्यमंत्र्यांना "मी व माझ्या भावाने पणत्या विकून जमवलेले पैसे कोरोना विरोधातील लढ्यासाठी देत आहे, कृपया याचा स्विकार करावा'' असे पत्र लिहीले. 

Coronavirus : स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

"देशावर जेव्हा संकट येते तेव्हा आपण त्यासाठी मदत केली पाहिजे असे मला व माझ्या भावाला वाटले, त्यामुळे आम्ही पणत्या विकून कमावलेले ९०० रुपयांची मदत केली आहे. उपाशी लोकांना यातून मदत होईल."
- अर्जुन सदलगे
Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका

"लाॅकडाऊनमुळे अनेकजण उपाशी आहेत याची जाणीव अर्जुन व अर्णव या दोघांना झाली. त्यामुळे त्यांनी कमावलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पैसे आॅनलाईन जमा करण्यासाठी मी मदत केली."
- निखील सदलगे
बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...​

loading image