लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एकाला लष्कराच्या अधिकार्यानी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार वानवडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लष्कराच्यादृष्टिने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थापैकी वानवडी येथील लष्करी वैद्यकिय महाविद्यालय आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयातही सुरक्षिततेच्या दृष्टिने लष्कराकडुन पुरेपर काळजी घेतली जाते. त्यानुसार महाविद्यालयाच्या आवाराध्ये एक व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे महाविद्यालयाच्या अधिकारी व कर्मचार्याच्या निदर्शनास आले. "एएफएमसी" असे लिहिलेला गणवेश संबंधित व्यक्तीने घातलेला होता. व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्याने त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे कसुन चौकशी करण्यात आली.

दरम्यान, चौकशी केल्यानंतर त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वानवडी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे, अद्याप त्या व्यक्तिकडुन पुरेशी माहिती मिळाली नसल्याचे पोलिस निरीक्षक गवारे यांनी सांगितले.

Web Title: Army medical college suspect arrested

टॅग्स