सैन्य भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी लष्करातील एका अधिकाऱ्यास तामिळनाडूत अटक

Army officer arrested in Tamil Nadu in army recruitment exam paperwork case
Army officer arrested in Tamil Nadu in army recruitment exam paperwork case

पुणे : लष्करभरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात गुन्हे शाखेने तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथून शनिवारी मध्यरात्री लष्करातील एका मेजर रॅंकच्या अधिकाऱ्याला अटक केली, तर रविवारी त्यास पुण्यात आणण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात लष्करातील बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लष्कराच्या "रिलेशन आर्मी" अंतर्गत मागील रविवारी पुण्यासह देशात 43 ठिकाणी सामाइक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील 40 हजार उमेदवार बसले होते. मात्र या परिक्षेतील प्रश्नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वानवडी व विश्रांतवाडी येथे दाखल दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 7 ते 8 जणांना अटक केली होती.त्यामध्ये एका लष्करी कर्मचारी, एक निवृत्त कर्मचारी व अन्य काही जणाचा समावेश होता.

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​ 

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही लष्करी अधिकाऱ्याची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाला महत्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथून शनिवारी मध्यरात्री लष्करातील एका मेजर रैंकच्या आधिकाऱ्याला अटक केली, त्यानंतर त्यास रविवारी पुण्यात आणण्यात आले.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणात एक नवीन अटक असून त्याची चौकशी चालू असल्याचे सांगितले. तर लष्करी सूत्रांनी अटक केलेला अधिकारी मोठ्या हुद्दयावरील असून त्याच्यावर पेपर लिक केल्याचा संशय आहे. त्याने वानवडी पोलिसात नोंदलेल्या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांपैकी एकाला प्रश्नपत्रिका पाठवल्याचा संशय आहे. या अटकेमुळे एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

संबधित बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com