वारजे माळवाडी येथे सुमारे 7 लाखाची घरफोडी

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 17 मे 2018

वारजे माळवाडी : वारजे गावठाणातील तालमीजवळील बराटे यांच्या इमारतीतून कुलूप तोडून घरातील कपाटातील 14 तोळे सोने व सुमारे 2 दोन लाख 68 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. दोन्ही मिळून सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. 

वारजे माळवाडी : वारजे गावठाणातील तालमीजवळील बराटे यांच्या इमारतीतून कुलूप तोडून घरातील कपाटातील 14 तोळे सोने व सुमारे 2 दोन लाख 68 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. दोन्ही मिळून सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. 

अज्ञात व्यक्तिच्या विरुद्ध हा घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. असे वारजे माळवाडी पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी सांगितले. दत्तात्रेय छबुराव बराटे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दत्तात्रेय हे आई लिलाबाई व पत्नी समवेत त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. दुसऱ्या मजल्यावर मुलगा सून राहते. तर तिसऱ्या मजल्यावर कॉलेजची मुले भाड्याने राहतात. 

दत्तात्रय यांच्या आई लिलाबाई ऊर्फ नानी बराटे या बुधवारी सकाळी घरी होत्या. त्यांच्या सोबत राहणारा मुलगा सून घराबाहेर गेल्यानंतर. साडे अकरा वाजता घराला कुलूप लावून इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन बसल्या. त्या दुपारी दोन वाजता घरी परत आल्यावर घराला कुलूप नव्हेत. त्यांनी दार उघडून घरात जाऊन पाहिले असता. कपाट उघडे व दागिन्यांचा डबा रिकाम खाली काढून ठेवलेला दिसला. त्यावेळी, चोरी झाल्याचे लक्ष्यात आले. रात्री उशिरा तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. याबाबत वारजे माळवाडी पोलिस अधिक तपास करीत आहे. 

Web Title: Around 7 lakhs of burglary at Warje Malwadi