अर्पिताच्या शिक्षणास मिळाले बळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

सहकारनगर : समाजात एकीकडे लेक वाचविण्याचा संदेश दिला जात असला तरी दुसरीकडे "ति'चे अस्तित्व खोडून काढण्याची मानसिकता अजूनही अस्तित्वात आहे. अशा मानसिकतेला अर्पिताही बळी ठरली. जगात पाऊल ठेवताच अर्पिताच्या वडिलांनी तिची जबाबदारी जुगारली. तेव्हा अर्पिताच्या आजीने तिचा सांभाळ केला; मात्र आजीची आर्थिक कुचंबणा होऊ लागली आणि अर्पिताचे शिक्षण थांबले; परंतु आता तिच्यातील धडाडीला आधार मिळाला आहे तो आदर प्रतिष्ठानचा. यामुळे अर्पिता रोज शाळेत जाऊ लागली आहे. 

सहकारनमधील एका कुटुंबात अर्पिता बनकरचा जन्म झाला; मात्र तिच्या वडिलांनी तिला नाकारले होते. त्यामुळे तिच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नगरसेविका साईदिशा माने यांनी अर्पिताला दत्तक घेतले. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आता पूर्ण होणार आहे. एवढेच नाही तर तिला क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करता यावी, यासाठी तिला क्रीडा प्रशिक्षक आणि साहित्यही उपलब्ध करून दिले आहे. यामुळे तिला आता जिम्नॅस्टिक, डान्सिंग, स्वीमिंग कलेचे धडे मिळणार आहेत. 

याबाबत माने म्हणाल्या, ""अर्पिताचे पूर्ण शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील करिअरची जबाबदारी मी घेतली आहे. विशेषत: ती रोज शाळेत जाईल, याकडे माझे लक्ष राहणार आहे. तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही मदतीचा प्रयत्न असेल. आतापर्यंत प्रतिष्ठानने 97 मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली आहे.'' 

मला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे; पण त्याआधी शिक्षणही महत्त्वाचे आहे. त्यात अडचणी आल्याने शिक्षण थांबण्याची वेळ आली; मात्र आदर प्रतिष्ठानच्या मदतीने मी शाळेत जात आहे. माझे शिक्षण थांबणार नाही, याचा मला आनंद आहे.'' 
- अर्पिता 
 
Web Title: Arpita's education got its strength