आळंदीरांना पर्यायी पाण्यीच व्यवस्था करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

आळंदी : पिंपरी महापालिका हद्दीतून जोपर्यंत प्रदुषित पाणी इंद्रायणीत सोडणे बंद होत नाही तोपर्यंत महापालिकेकडून आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरवण्याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे आळंदी शहरविकास आराखड्यात एसटीपीच्या जागेचे मंजूर आरक्षण ऐनवेळी बदलल्याप्रकरणी चौकशी लावण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज आळंदीत दिले.

आळंदी : पिंपरी महापालिका हद्दीतून जोपर्यंत प्रदुषित पाणी इंद्रायणीत सोडणे बंद होत नाही तोपर्यंत महापालिकेकडून आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरवण्याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे आळंदी शहरविकास आराखड्यात एसटीपीच्या जागेचे मंजूर आरक्षण ऐनवेळी बदलल्याप्रकरणी चौकशी लावण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज आळंदीत दिले.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज आळंदीत शासकिय विश्रामगृहात बैठक आयोजित केल होती. यावेळी आळंदीकरांनी पिंपरी महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदुषित पाण्याची तक्रारी मांडल्या आणि महापालिकेने जबाबदारी स्विकारून पिण्याचे पाणी पुरविण्याची मागणी मंत्री कदम यांच्याकडे आज केली होती.

यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले की,पिंपरी महापालिका हद्दीतून प्रदुषित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडल्याने इंद्रायणीची आणि आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे.नदीप्रदुषण थांबविणे आणि नदीसुधार योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईलच.मात्र पिंपरी महापालिका जोपर्यंत प्रदुषित पाणी आळंदीतील इंद्रायणी नदीत सोडत आहे.तोपर्यंत आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरविण्याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जाईल.तसा आदेशही महापालिकेला लवकरच देवू.मात्र त्यासाठी आळंदीकरांनी तसा पत्रव्यवहार करावा.त्याचप्रमाणे आळंदीच्या एसटीपीसाठी राज्यतिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून अठरा कोटी रूपये मंजूर आहेत.

नव्वद टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले. मात्र एसटीपीचे काम अद्याप जागेअभावी सुरू झाले नाही. आळंदी शहर विकास आराखडा मंजूर झाला. त्यामधे पूर्वी असलेल्या जागेचे आरक्षण हटवून नव्या ठिकाणी आरक्षण हटवून नव्या ठिकाणी तसेच शेजारील गावच्या चऱ्होली आणि धानोरे गावच्या गायरानात आळंदीसाठीचा एसटीपी करण्याचा प्रस्ताव दिला. याबाबत मुळचे आरक्षण कोणी हलविले याची सखोल चौकशी करून कारवाईचे आश्वासन कदम यांनी दिले.

आळंदी विकास मंचच्या माध्यमातून संदिप नाईकरे यांनी मंत्री कदम यांना साहेब मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी मोठ्या माणसांपुढे खोटं बोलत नाही. पण तुम्ही सरकारच्यावतीने घेतलेला प्लॅस्टिकबंदीचा निर्णय योग्य असून आम्ही तुमच्या चांगल्या निर्णयाचे स्वागत करतो असे सांगितल्यावर उपस्थीत मंत्रीमहोदयांसह अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. नाईकरे यांना उद्देशून खरा, प्रामाणिक आणि चिकना माणूस आहे. आपल्याला सेनेत अशा कार्यकर्त्यांची गरज आहे. अरे याला पक्षात घ्या अशी मिश्किल टिपणी केल्याने सुरूवातीला गंभिर वातावरणात झालेल्या बैटकीचा शेवट सर्वांच्या हास्याने संपली.

Web Title: Arrange Alandi the alternative water