कारवाईमुळे एक कोटींपेक्षा जास्त थकबाकी जमा - सह-आयुक्त दिलीप गावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पिंपरी - महापालिका मिळकतकराची १ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या दोन मिळकतधारकांवर महानगरपालिका करसंकलन विभागाने बुधवारी जप्तीची कारवाई केली. त्यानंतर संबंधितांनी अर्ध्या तासाच्या आत मिळकतकर थकबाकी रकमेचे धनादेश करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले, अशी माहिती सह-आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

सांगवी-जवळकरनगर येथील खासगी मॉल आणि ताथवडे येथील सात गोदामांवर ही जप्तीची कारवाई केली. जप्ती पथकाने कारवाई सुरू केली असताना संबंधित मिळकतधारकांनी अनुक्रमे ९९ लाख व ४० लाख ६५ हजार रुपयांच्या मिळकतकर रकमेचे धनादेश करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. 

गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी संदीप खोत, सहायक मंडलाधिकारी विठ्ठल भोसले व जयश्री साने यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. करसंकलन विभागामार्फत मिळकत जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकत जप्तीची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, तरी मिळकतधारकांनी मिळकतकराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन गावडे यांनी केले. 

पालिकेकडे आत्तापर्यंत ३६६ कोटी ७० लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने ३१ मार्चपर्यंत सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी देखील ही कार्यालये सुरू ठेवली जातील. नागरिकांना मिळकतकराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरता येईल. त्याशिवाय महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकतकर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: arrears one crore collection