अडतीस हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - वीज बिल थकबाकीदारांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मार्च महिन्यात बुधवार (ता. 22) पर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील 38,764 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पुणे परिमंडलातील 38,764 थकबाकीदारांकडे 11 कोटी 83 लाख रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगावसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्‍यांतही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

आज-उद्या वीजबिल भरणा केंद्र सुरू
ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे 25 व 26 मार्चला सुरू राहणार आहेत, अशी माहिती महावितरणने कळविले आहे.

Web Title: arreats electric supply close