वेश्‍या व्यवसायास प्रवृत्त करण्याऱ्या तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

येरवडा : नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वेश्‍या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या शुभम सुखदेव सोनवणे (वय 25, रा. संजय पार्क, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. शुभम हा दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांचा मुलगा आहे. 

सोनवणे यांच्यासह इतर दोन आरोपींनी फिर्यादी युवतीला पश्‍चिम बंगालमधून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पुण्यात बोलविले. आरोपींनी युवतीला धमकी देऊन वेश्‍या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. शुभमने पीडित युवतीला वेश्‍या व्यवसायासाठी लाल रंगाच्या मोटारीत बसवून मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, युवतीने आरोपींची नजर चुकवून मोबाईलवरून 100 क्रमांकावर संपर्क केला. आरोपींनी पोलिसांना पाहताच पलायन केले.

पोलिसांनी पीडित युवतीची चौकशी केल्यानंतर त्यांना सर्व घटना समजली. त्यानंतर शुभमला अटक केली. या संदर्भात सुखदेव सोनवणे यांनी विमानतळ पोलिसांनी कटकारस्थान रचून मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला. या संदर्भात पोलिस आयुक्तांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
Web Title: The arrest of the boy who force to do prostitute business