पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक 

crime_logo
crime_logo

पिंपरी (पुणे) : दारू पिऊ नको, कामावर जा, असे सांगितल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (ता.१०) सकाळी घडली.

सुभाष दिनकर पांचाळ (वय ३० रा. तुकाराम बनकर यांची चाळ, टायगर गुहा, मोशी. मुळगाव बामणी मंडळ, तानूर, जि. निजामाबाद, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय पत्नीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या मुलीसह घरात झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपले पती आरोपी सुभाष याला कामावर जा, दारू पिऊ नका, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्या आरोपी सुभाष याने पत्नीच्या अंगावर बसून तिचा गळा दाबून 'जिवंत सोडत नाही' असे म्हणून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक निरीक्षक विठ्ठल साळुंके याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com