कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी आरोपींना अटक करावी

मिलिंद संगई
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : कोरेगाव भीमा दंगलीतील घर जळीतप्रकरणाची फिर्यादी व प्रमुख साक्षीदार पुजा सकट हिच्या संशयास्पद म्रुत्युस जबाबदार आरोपींना तात्काळ अटक करावी  या मागणीसाठी आज बारामतीत आंदोलन केले गेले. 

दंगलपिडीत सकट कुटुंबाचे शासनाने पुनर्वसन करावे, कोरेगाव दंगलीतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अँट्रासिटी प्रकरणात फिर्यादी व सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दरोडयासारखे गंभीर गुन्हे दाखल करणा-या अधिका-यांना निलंबित करा अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. 

उपनराध्यक्ष बिरजू मांढरे, सुनिल शिंदे, साधू बल्लाळ, अनिकेत मोहिते, मधूकर मोरे, रविंद्र सोनवणे, अभिजीत कांबळे,  रत्नप्रभा साबळे, शुभम अहिवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: arrest masterminds behind koregao bhima riots