सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 50 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. त्याचा एक साथीदार फरार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या आरोपीकडून तब्बल 60 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती परिमंडल दोनचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे यांनी दिली.

शरीफ काळे ऊर्फ अमीर अंतनू शिंदे (वय 30, रा. गांधीनगर, देहू रस्ता) असे या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार नीलेश अंकुश काळे अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नाना पेठेतील भाजी मंडई परिसरातील एका घरातून अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले होते. याबाबत स्वाती संतोष गायकवाड यांनी तक्रार दिली होती. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोर आढळून आला. त्याआधारे तपास केला असता, पोलिसांना तो चोर नाशिक फाट्याजवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपींनी फरासखाना, चिंचवड, वाकड, निगडी, पिंपरी, चतु:शृंगी, खडकी, वारजे, डेक्‍कन, येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात घरफोडीचे गुन्हे केले आहेत. पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे, सहायक आयुक्‍त नीलेश मोरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण, नितीन अतकरे, संतोष काळे, दत्तात्रेय येळे, अनिल शिंदे, नवनाथ भोसले आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Arrested the accused from the CCTV footage