बलात्कार प्रकरणी फरार आरोपीस पुण्यातून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे : मुंबई येथील एका महिलेवर बलात्कार प्रकरणी फरारी असलेल्या पंकज चव्हाण (वय 28, रा.संतोषनगर, गोरेगाव,मुंबई) यास समर्थ पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली. याप्रकरणी मुंबईतील दिडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चव्हाण हा फरारी झाला होता. समर्थ पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांकडे सुपुर्द केले.

समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, चव्हाण याने सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. नंतर त्याने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून चव्हाण फरार आहे.

दरम्यान, चव्हाण पुण्यात असून मंगळवार पेठेतील 15 ऑगस्ट चौकामध्ये येणार असल्याची खबर दिंडोशी पोलिसांना मिळाली. तात्काळ ही माहिती पुणे पोलिसांना देत त्यांनी पुण्याकडे धाव घेतली. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी चव्हाण यास ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान चव्हाण याने सदर महिलेची फसवणूक केल्याचे कबूल केले. समर्थ पोलिसांनी त्यास मुंबई पोलिसांकडे सुपुर्द केले.

Web Title: Arrested accused in rape case arrested in Pune