पुणे : वृद्ध महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोक्‍यात काच मारुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरूवारी रात्री आठ वाजता नाना पेठेत घडला. 

पुणे : बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोक्‍यात काच मारुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरूवारी रात्री आठ वाजता नाना पेठेत घडला. 

आकाश संदीप गायकवाड (वय 22, रा.उरळीकांचन), नाजीम जाकीर शेख (वय 22, रा.उरळीकांचन ), किशोर बाळासाहेब गाडे (वय 19, रा.उरळी कांचन), झिशान मुशक्ताक खान (वय 27, रा.उरळी कांचन) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. तर जयनब्बी कमरुद्दीन शेख असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (वय 34, रा.नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आजी जयनब्बी शेख यांचा बांगड्यांचा स्टॉल आहे. हा स्टॉल रस्त्यामध्येच असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी, तसेच वाहने जाण्यासाठी त्रास होतो. संबंधीत स्टॉल हटवावा, यासाठी महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यावरुन वृद्ध महिलेशी अनेकांची भांडणे झाली होती.

वृद्ध महिला स्टॉल हलविण्यास तयार नव्हती. या महिलेला धमकाविण्याबाबत आकाश गायकवाड यास सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार, तो महिलेला धमकाविण्यास गेला. त्यावेळी संबंधीत महिलेने त्याच्याशी वाद घातला. त्यामुळे चिडून त्याने महिलेच्या डोक्‍यात काच मारुन पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्यास पाठलाग करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याच्या साथीदारांना अटक केली. गायकवाड यास महिलेला मारण्याची सुपारी कोणी दिली, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. 
 

Web Title: arrested accused trying to murder old age woman