घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक ; 13 लाख 42 हजारचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे : घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास चतु:शृंगी पोलिसांनी आज (ता. 8) अटक केली. घरफोडी करणाऱ्या या गुन्हेगारांकडून 13 लाख 42 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 11 ठिकाणी घरफोडया झाल्या होत्या. त्यामुळे चतु:शृंगी परिसरात नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. 

जयवंत उर्फ जयडया गोवर्धन गायकवाड असे घरफोडी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी यापूर्वीच तडीपार केले होते तरी तो चोरीचे प्रकार करत होता. त्याच्या घरातुन 18 तोळे तर सोनाराकडुन 22 तोळे सोने जप्त चतु:शृंगी पोलिसांनी केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षापासून 2006 पासून आतापर्यंत 87 गुन्हे जयवंतने केले आहेत. 2013 ला आरोपीला एक वर्ष तीन महिने चोरीच्या गुन्हयात शिक्षा दिली होती. 
 
Web Title: Arrested a burglar criminals and 13 lakh 42 thousand worth of money seized