अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक; 2 किलो गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे : बेकायदा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने खडकी येथे अटक केली. त्यांच्याकडून 42 हजार रुपये किंमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. ला. 

पुणे : बेकायदा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने खडकी येथे अटक केली. त्यांच्याकडून 42 हजार रुपये किंमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. 

देविदास श्रीपती शिंदे (वय 50, रा. रेंजहिल्स रेल्वे लाईन, खडकी) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युनिट चारच्या पथकाकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने गस्त घालण्याचे काम सुरू होती. दरम्यान पोलिस कर्मचारी राजु मचे व गणेश साळुंखे यांना पोलिस अभिलेखावरील गुन्हेगार शिंदे हा खडकीतील मरिआई माता मंदिराजवळ लपून छपून स्वतःच्या ओळखीच्या लोकांना गांजा विक्री करत असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. त्यावेळी शिंदे हा हातात नायलॉनची पिशवी घेऊन चालत जात होता. पोलिसांनी त्यास हटकल्यानंतर तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडील पिशवीमध्ये 42 हजार रुपये किंमतीचा दोन किलो गांजा आढळून आला. त्यास खडकी पोलिसांकडे सुपुर्द केले. त्यावेळी संबंधित आरोपीस यापुर्वीही चरस विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पुढे आली. 
 

Web Title: Arrested criminals who sell narcotic drugs; 2 kg of ganja seized