दुचाकी चोरी करणाऱ्या 4 जणांची टोळी गजाआड; चोवीस दुचाकी जप्त

 Arrested Gang of 4 bike thieves and Twenty-four bikes seized
Arrested Gang of 4 bike thieves and Twenty-four bikes seized

नारायणगाव : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामिण व नारायणगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने जुन्नर,आळेफाटा, नारायणगाव,अकोला भागात दुचाकीची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. अरोपीकडून तीन दिवसांत सहा लाख अकरा हजार रुपये किंमतीच्या चोवीस दुचाकी जप्त केल्या आहेत.
अशी माहीती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी.के.गुंड यांनी दिली.

या प्रकरणी सचिन बाळु दिघे (वय ३१ राहणार ढगेवाडी, पळसपुर ता. पारनेर),ऋशीकेष किसन दरेकर( वय २० वर्ष. राहणार पारगाव तर्फे आळे ता.जुन्नर), अशिष  सुनील बेल्हेकर( वय २८), पवन दत्तात्रय शेजवळ (वय ३३,दोघेही राहणार नारायणगाव, ता. जुन्नर ) यांना अटक केली आहे.

हेही वाचा :  पिंपरी-चिंचवडमध्ये विकासापेक्षा श्रेयवादाचा उदे उदे!

मागील दीड महिन्यात नारायणगाव व जुन्नर परिसरातील दुचाकींची मोठया प्रमाणात चोरी झाली होती.दुचाकी चोरांचा पोलीस शोध घेत होते.१७ डिसेंबर २०२० रोजी चोरीतील मोटार सायकल विक्रीसाठी  सचिन दिघे, ऋशीकेश दरेकर हे पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण व नारायणगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने त्यांना अटक केली होती. यावेळी आरोपींकडून तीन लाख पाच हजार रुपये किंमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या होत्या.दरम्यान तपासात बेल्हेकर व शेजवळ हे दुचाकी चोरीस मदत करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बेल्हेकर व शेजवळ यांना  आज नारायणगाव बसस्थानक परिसरात सापळा लावून अटक केली. चौकशीत आरोपीनी तीन लाख सहा हजार रुपये किमतीच्या अकरा दुचाकी नारायणगाव व जुन्नर परिसरातून चोरी केल्याची माहिती दिली. या दुचाकी आरोपीकडून जप्त केल्या आहेत. एकुणच पोलिसांनी मागील तीन दिवसांत चार आरोपींकडून चोवीस दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरांच्या टोळीचा छडा लावण्यात यश आल्याने नागरिकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस एन. एस. गंधारे,पोलीस हवालदार विक्रम तापकीर, हनुमंत पासलकर, दिपक साबळे, संदिप वारे, निलेश सुपेकर, सचिन गायकवाड, राजु मोमीन, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे, प्रसाद पिंगळे या पथकाने  दुचाकी टोळीचा छडा लावला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com