वाकड येथे गांजा विक्री करणाऱ्या वृद्धास अटक 

संदीप घिसे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) : गांजा विक्री करीत असलेल्या एका वृध्दास पोलिसांनी अटक केली. ही घटना वाकड येथे घडली. चंदु प्यारअप्पा पुजारी (वय ६०, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे. 

पोलिस उपनिरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात पोलिस गस्त घालत असताना बुधवारी काळाखडक, वाकड परिसरामध्ये एक व्यक्ती संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये चार किलो ३६५ ग्रॅम वजनाचा ६८ हजार रुपये किमतीचा गांजा मिळाला.

वरिष्ठ निरीक्षक सतीश माने निरीक्षक सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश माने आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Arrested old man who sells ganja at Wakad

टॅग्स