दुबईहून विमानातून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशास अटक; 74 लाखांचे सोने जप्त 

Arrested a passenger in pune for smuggling gold by plane from Dubai
Arrested a passenger in pune for smuggling gold by plane from Dubai

पुणे : दुबईहून आलेल्या विमानातून तस्करी करण्याच्या उद्देशाने एका प्रवाशाने आणलेले तब्बल 74 लाख रुपये किंमतीचे पेस्ट स्वरुपातील सोने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. शनिवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

पेनकर जुहेर झाहीद (रा. म्हासाला, रायगड) असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशाचे नाव आहे. झाहीद हा शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दुबईहून आलेल्या स्पाईस जेट या विमानातून आला. त्यावेळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती. त्यावेळी त्याच्या जीन्स पँटच्या अंतर्गत खिशांमध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरुपातील सोने आढळून आले. तर दुसरी प्लॅस्टिकची पिशवी त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये त्याने ठेवली होती. असे एकूण 2196 ग्रॅम इतक्‍या वजनाचे 74 लाख 41 हजार रुपये किंमतीचे सोने अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून जप्त केले.

Shocking ! पिंपरीत पाच वर्षीय चिमुकलीवर जेष्ठाकडून लैंगिक अत्याचार

सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे, पुणे विभागाच्या सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त मोतीलाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पळनीटकर व प्रतिभा माडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. झाहीदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

प्रवाशांकडून सोने, मौल्यवान वस्तू व अन्य प्रकारची होणारी तस्करी लक्षात घेऊन सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जाते. अशी प्रकरणे घडू नयेत, यादृष्टीने कारवाईवर भर दिला जात असल्याचे पतंगे यांनी सांगितले. 
महाविकासआघाडीच्या सरकरमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com