पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे :  बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील वैदूवाडी भागात त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल व चार काडतुसे जप्त करण्यात आली. 

पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील वैदूवाडी भागात त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल व चार काडतुसे जप्त करण्यात आली. 

कय्यूम शब्बीर शेख (वय 30, रा. संभाजीनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने पोलिसांकडून शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.

हडपसर पोलिसांकडूनही अशा गुन्हेगारांवर लक्ष्य ठेवले जात आहे. त्यानुसार हडपसर परिसरामध्ये एक व्यक्ती बेकायदा पिस्तूल घेऊन हडपसरमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिस नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक सुनील तांबे, सहायक निरीक्षक संजय चव्हाण, कर्मचारी युसूफ पठाण, संपत अवचारे, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख यांच्या पथकाने वैदूवाडी येथे सापळा रचून आरोपीस अटक केली. 
 
Web Title: Arrested in the public place of illegal pistol