पुणे : प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

पुणे : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय ४५ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत  फिर्याद दिली होती.

पुणे : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय ४५ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत  फिर्याद दिली होती.

गौरव शिवराम गायकवाड (वय १९, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय १९, रा. भुजबळ वस्ती, चाकण),  शुभम तात्या काळे (वय १९, रा. गंगानगर, फुरसुंगी), अंकित शिवाजी राऊत (वय २६, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी), अमोल राजू शिंदे (वय २१, गंगानगर, फुरसुंगी), रोहित दीपक भोसले (वय २४, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहसीन शेख हे रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन वरून उरुळी कांचन येथे जाण्यासाठी थांबले होते. एका रिक्षाचालकाने त्यांना लिफ्ट देण्याच्या बहान्याने रिक्षात बसवून घेतले. हडपसर आकाशवाणी येथे आले असता रिक्षाचालकाने रिक्षा थांबवून शेख यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने रिक्षाचालकाने त्यांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर मिस्ड काँल करून पाच साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून शेख यांच्याकडील रोख सातशे रुपये व मोबाईल काढून घेतला. शेख यांनी त्याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण दिलीप गाडे प्रसाद लोणारे यांच्या पथकाने गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन काही तासातच आरोपींना पकडण्यात यश मिळविले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested robbers gang In Pune