21 घरफोड्या, 20 किलो सोने, 109 किलो चांदी, सहा वाहने अन्‌ बरचं काही ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

​वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी वानवडी व अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या घटनांच्यावेळीचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवून त्याचे विश्‍लेषण केले. विशेषतः वाकड येथील कनक ज्वेलर्स, अंबिका ज्वेलर्स, चिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स व सिंहगड रोड येथील ओम ज्वेलर्स या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहताना संबंधीत आरोपींच्या चालण्याच्या व वागण्याच्या हालचालींवरुन ते हडपसरमधील रामटेकडी परिसरातील असल्याचा संशय पोलिसांना आला. 

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात घरफोड्या, चोरी व सराफी दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित आरोपींकडून पोलिसांनी 20 तोळे सोने, 109 किलो चांदीचे दागिने, आठ चारचाकी व दुचाकी वाहने असा तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी दोन्ही शहरांमध्ये 21 गुन्हे केल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. 

पिॆपरी चिंचवडमध्ये टपाल कार्यालयांतील कामकाज ठप्प कारण....

तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय 28, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर), जयसिंग उर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय 26, रा. बिराजदारनगर, वैदुवाडी, हडपसर) या संशयित आरोपींस चोरीचा माल स्विकारणाऱ्या बंडु वसंत वाघमारे (वय 35, रा. गोसावीवस्ती, हडपसर) यास अटक केली आहे.

Image may contain: shoes
अचानक मिनीबस रस्त्यावरील चहाच्या टपरीत शिरली अन्....

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी वानवडी व अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या घटनांच्यावेळीचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवून त्याचे विश्‍लेषण केले. विशेषतः वाकड येथील कनक ज्वेलर्स, अंबिका ज्वेलर्स, चिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स व सिंहगड रोड येथील ओम ज्वेलर्स या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहताना संबंधीत आरोपींच्या चालण्याच्या व वागण्याच्या हालचालींवरुन ते हडपसरमधील रामटेकडी परिसरातील असल्याचा संशय पोलिसांना आला.

No photo description available.

तुमच्या नावावर चुकून 6 टिव्ही बुक झाल्याचे सांगून अभियंत्याची फसवणूक

दरम्यान, पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नासीर देशमुख, नवनाथ खताळ, योगेश गायकवाड, सुधीर सोनवणे, महेश कांबळे, अनुप सांगळे यांच्या पथकाने तिलकसिंग व जयसिंग या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी विकीसींग कल्याणी, सनीसिंग दुधाणी यांच्यासमवेत पुणे व पिंपरी-चिंचवड येथे घरफोडी, वाहनचोरी व सराफी दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 तोळे सोने, 109 किलो चांदीचे दागिने, सहा कार, दोन दुचाकी, 27 हजार रुपयांची रोकड असा एक कोटी नऊ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

शरद पवारांना समन्स बजावावा;भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाकडे मागणी

एकाच गाडीची डबल चोरी 
हडपसर परिसरात राहणाऱ्या एका नागरीकाची वॅगनर कार चोरीला गेली होती. पोलिसांनी या गाडीचा तपास करुन आरोपीचा शोध घेतला. त्याच्याकडील कार ताब्यात घेऊन मालकाला परत केली होती. त्यानंतर अवघ्या नऊ दिवसानंतर आरोपींनी यापुर्वीच चोरलेल्या कारची पुन्हा चोरी करुन घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिचा वापर केल्याची माहिती चौकशीत उघड झाली.
आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested thief with gold and seliver jwellery worth more than one crore ruppes