कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून फरार आरोपींना अटकेत; पाच ते सहा आरोपी अद्यापही फरारच

Arrested Two fugitives after attacking a family
Arrested Two fugitives after attacking a family

किरकटवाडी(पुणे): किरकटवाडी (ता.हवेली) येथील शिवनगरमध्ये राहणाऱ्या रिंढे कुटुंबावर 3 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या हल्लेखोरांपैकी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तर पाच ते सहा आरोपी अद्यापही फरारच आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही.

अविनाश दशरथ वसवे (रा.शिवनगर, किरकटवाडी,ता.हवेली) व युसुफ चॉंद शेख (रा.गणपती माथा, वारजे, पुणे.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना कोर्टापुढे हजर केले असता 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापैकी अविनाश दशरथ वसवे हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर याअगोदरही हवेली पोलिस ठाण्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

3 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून अविनाश वसवे, युसुफ शेख व इतर सात ते आठ जणांनी किरकटवाडीतील शिवनगर येथे राहणारे गणेश रिंढे, राजाराम रिंढे,विजय रिंढे यांना काठ्या, कोयते यांनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर सर्व आरोपी दुचाकींवरून फरार झाले होते. 7 डिसेंबर रोजी यापैकी मुख्य आरोपीसह एकाला अटक करण्यात आली आहे. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम पुढील तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अटक दाखविण्यास जाणीवपूर्वक विलंब.....
दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मुख्य आरोपी अविनाश वसवेसह आणखी एक आरोपी स्वतःहून हवेली पोलिस ठाण्यात हजर झाला होता. चोवीस तासांपेक्षा जास्त काळ या आरोपींना हवेली पोलिस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते मात्र अटक दाखविण्यात आली नव्हती. याबाबत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती दिली. प्रत्यक्षात मात्र त्यानंतर आरोपींना अटक दाखविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 7 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 44 मिनिटांनी अटक दाखविण्यात आलेली आहे. 

पुन्हा चुली पेटवायच्या का? एलपीजी सिलिंडरचे दर वाढल्याने महिलांचा संतप्त सवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com