वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; दुचाकीस्वारास अटक

police1.jpg
police1.jpg

पुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. स्वारगेट येथील जेधे चौकात ही घटना घडली. स्वारगेट पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली.

प्रविण नेमीचंद मेहता (वय ४९, रा.अक्षय हाइटस, मुकुंदनगर, स्वारगेट) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी संतोष निकम यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांकडून शहरात विरूद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाई कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जेधे चौकात दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेदहा वाजता निकम कार्यरत होते. त्यावेळी दुचाकीस्वार मेहता विरूद्ध दिशेने येत होता. निकम यांनी त्यांना अडवले. विरूद्ध दिशेने येत असल्याने मेहता यांना समज दिली. त्यानंतर मेहता याने निकम यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलस निरीक्षक शबनम शेख तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com