
रोहित पक्ष्यांबरोबरच मंगोलियाहून स्थलांतरित बार हेडेड गुज (पट्टकादंब) या अतिशय सुंदर पक्ष्यांचेही येथे आगमण झाले आहे. हे पक्षी सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव, तक्रारवाडी परिसरामध्ये स्थलांतरीत परदेशी रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या आगमणास सुरुवात झाली आहे. चालू वर्षी उजनी धरणामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे रोहित पक्ष्यांचे आगमण सुमारे एक महिन्याने लांबले होते. उशिरा का होईना पक्ष्यांचे आगमण झाल्यामुळे पर्यटकांनी आणि पक्षी अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले.
उजनी धरणाच्या उभारणीनंतर मागील चाळीस वर्षापासून हिवाळी पयर्टनासाठी उजनी जलाशयाचे बॅकवॉटर एक उत्तम पर्याय म्हणून
पुढे येत आहे. उजनी जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, नौकाविहार, लाखो पक्ष्यांचा किलबिलाट, जलाशयावर विहार करणारे विविध प्रकारचे पक्षी, मच्छीमारांच्या होड्या, खमंग मासळीचे भोजन, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य सध्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर पाहावयास मिळत आहे.
- औरंगाबादनंतर आता पुण्याच्या नामांतराची मागणी
सध्या पक्षीमित्रांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रोहित पक्ष्यांच्या आगमणास सुरुवात झाल्यामुळे पक्षी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. रोहित पक्ष्यांबरोबरच चित्रबलाक, राखी बगळे, पान कोबड्या, बदक, सर्पमित्र, दविर्मुख, भोरड्या, नदीसूर, थापट्या, चक्रवाक, बहीर ससाणा आदींसारख्या पक्ष्यांची गर्दी जलाशयावर पाहावयास मिळत आहे.
बगळ्यासारखी उंची, अग्निपंख, काटकीसारखे लांब पाय, उंच मान आणि रुबाबदारपणा यामुळे रोहित पक्षी हा पक्षीनिरीक्षकांच्या आकषर्णाचा केंद्रबिंदू ठरला आहे. डिसेंबर, जानेवारीपासून ते एप्रिल-मे पर्यंत रोहित पक्ष्यांचे उजनी जलाशयावर वास्तव्य असते. परिसरामध्ये असलेली निरव शांतता, रहदारीपासून दूर, मुबलक खाद्य असे अनुकूल वातावरण या परिसरामध्ये असल्यामुळे मागील चाळीस वर्षांपासून रोहित पक्षी येथे सातत्याने येत आहेत.
- पुणे : मानलेल्या बहिणीला त्रास दिला म्हणून त्याने मित्राचा कापला गळा
सध्या इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव, तक्रारवाडी तसेच दौंड तालुक्यातील खानोटा परिसरामध्ये रोहित पक्ष्यांच्या आगमणास सुरुवात झाली आहे. रोहित पक्ष्यांबरोबरच मंगोलियाहून स्थलांतरित बार हेडेड गूज (पट्टकादंब) या अतिशय सुंदर पक्ष्यांचेही येथे आगमण झाले आहे. हे पक्षी सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
याबाबत येथील पक्षी अभ्यासक संदीप नगरे म्हणाले, चालू वर्षी उजनी धरणांमध्ये जास्त पाणी असल्यामुळे पक्ष्यांचे आगमण थोडे लांबले होते.
परंतु सध्या रोहित पक्ष्याचे उजनी जलाशय येथे आगमणास सुरुवात झाली आहे. सध्या पक्ष्याची संख्या कमी असली तरी आणखी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. रोहित पक्ष्यांबरोबरच मंगोलियाहून येत असलेल्या बार हेडेड गूज या अतिशय सुंदर पक्षांचेही आगमण झाले आहे.
- 'होम मिनिस्टर'चा राग काढण्यासाठी गृहमंत्र्यांची येरवडा जेलमध्ये पैठणी खरेदी
(छायाचित्रे - संदीप नगरे)
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)