वंदे मातरम रक्तदान जागरूकता अभियान रॅलीचे पुण्यात आगमन

कोरोना काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना उपचारादरम्यान अडचणी निर्माण झाल्या होत्या.
pune
punesakal

पुणे : कोरोना काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना उपचारादरम्यान अडचणी निर्माण झाल्या. भविष्यात ही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून जास्तीत जास्त लोकांना रक्तदानाच्या उपक्रमात सहभागी करण्याचा प्रयत्न राज्य पातळीवर केला जात आहे. तर ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या रक्त संकलन उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही साडेसहा हजार पेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले आहे. अशी माहिती देवता लाइफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर बावणे यांनी दिली.

देवता फाउंडेशनच्या वतीने राज्यात वंदे मातरम रक्तदान जागरूकता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे आगमन शनिवारी पुण्यात झाले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी फाउंडेशनच्या सारिका पेंडसे, निलीमा बावणे, डॉ. रवी गिऱ्हे, कस्तुरी बावणे आदी उपस्थित होते. रॅलीची सुरवात २ ऑक्टोबरला नागपूर येथून झाली. तसेच अकोला, जळगाव, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर मार्गे ही रॅली पुण्यात दाखल झाली आहे. तर रविवारी (ता. १०) ही रॅली नगरला रवाना होईल. रक्तदानासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

बावणे म्हणाले, ‘‘पुण्यात १ आणि २ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तर सध्या राज्यातील विविध रक्तपेढ्यांशी करार करण्यात आला आहे. तर संकलित करण्यात आलेल्या रक्त पिशव्यांमधून २५ टक्के रक्त पिशव्या फाउंडेशनकरिता राखीव ठेवण्यात आले येत आहे. त्यामुळे हे रक्त फाउंडेशन तर्फे गरजू लोकांना मोफत दिले जाणार.’’

या रक्तदान जागरूकता अभियान रॅलीबरोबर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे देखील आयोजित केले जात आहे. तसेच फाउंडेशनच्या वतीने लवकरच राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे रक्ताची गरज भासल्यास या लोकांना त्वरित रक्त पिशव्या उपलब्ध होतील. असे यावेळी डॉ. गिऱ्हे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com