पुणे : दूध व्यावसायिक खून प्रकरणातील आरोपीच्या घराची जाळपोळ

pune
pune

पुणे : औंध येथील दूध व्यावसायिक रोहित जुणवने याच्या खून प्रकरणावरुन संबंधित आरोपीचे घर जाळण्याचा प्रकार शनिवारी (ता.3) सकाळी साडे नऊ वाजता घडला.  घर जाळणाऱ्यांची अद्याप ओळख पटली नाही, मात्र काही काही महिलांनी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर चतु:श्रृंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. आरोपीचे घर नवीन असून त्यामध्ये ठेवलेल्या सर्व संसारपोयोगी वस्तु जळून खाक झाल्या. दरम्यान शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोरहे यांनी जूनवणे याच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com