अनुभवा चित्रकलेचा प्रवास 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ़ फाईन आर्टस्‌ येथे एक आगळे वेगळे दृश्‍य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला साजेशा अशा या प्रदर्शनात चित्रकलेचा चित्रमय प्रवास अनुभवू शकता. या प्रदर्शनात पेशवेकाळापासून आजच्या काळापर्यंत चित्रकलेच्या क्षेत्रावर विशेष प्रभाव टाकणाऱ्या निवडक सहा व्यक्तींच्या "स्टुडिओ"ची मांडणी करण्यात आली आहे. त्यातील वातावरण, साहित्य, इतर गोष्टी या बरोबरच त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत.कलाकारांच्या चित्रनिर्मिती मागील त्यांचे विचार तसेच त्यांच्या चित्र निर्मिती प्रक्रियेबद्दल जाणून घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

या ठिकाणी पेशवेकालीन चित्रकार तांबट यांपासून गोपाळ देऊसकर, डी.एस्‌. खटावकर, बाळ वाड, वा.म. भट आणि विजय शिंदे अशा चित्र क्षेत्रातील विविध प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. याच बरोबर केवळ पुण्याचा चित्रकला क्षेत्राचा प्रवासही सचित्र पाहण्याची अनोखी संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे. हे प्रदर्शन धनकवडी येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌, कालादालनामध्ये रविवारपर्यंत (5 मार्च) सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य विनामूल्य खुले राहील. 

सर्वसामान्यांपासून नवोदित चित्रकारांनाही या परंपरेतील शिलेदारांची माहिती व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
या प्रदर्शनाची संकल्पना, संकलन आणि मांडणी डॉ. नितीन हडप,प्रमोद रिसवडकर आणि अभय जोशी यांनी केली आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृत्तपत्रविद्या विभागचे संचालक केशव साठ्ये यांच्या हस्ते झाले. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाहक डॉ. एम्‌.एस्‌. सगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

""पुण्यामधील रसिकांमध्ये दृश्‍य कलेबाबत साक्षरता करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत. तसेच हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठीही प्रेक्षणीयअसल्याचे,'' प्रमुख उपस्थित साठ्ये यांनी प्रदर्शनाविषयी बोलताना सांगितले. या कार्यक्रमास भा.वि.कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌चे उपप्राचार्य रुपेश हिरुगडे, उमाकांत कानडे, पोपट माने, पुणे बिनालेचे संचालक किरण शिंदे आणि दृश्‍यकलेचे विद्यार्थी उपस्थित होते. 

Web Title: Art exhibition in Bharati vidyapeeth