कला व्यवहार समजून घ्या - सुमित्रा भावे

ज्योत्स्ना भोळे सभागृह (हिराबाग) - मयूरी अत्रे हिला रंगसेतू अभ्यासवृत्ती प्रदान करताना ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या- दिग्दर्शक सुमित्रा भावे.(मागे उभे डावीकडून) दिलीप बोरावके व प्रमोद काळे.
ज्योत्स्ना भोळे सभागृह (हिराबाग) - मयूरी अत्रे हिला रंगसेतू अभ्यासवृत्ती प्रदान करताना ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या- दिग्दर्शक सुमित्रा भावे.(मागे उभे डावीकडून) दिलीप बोरावके व प्रमोद काळे.

पुणे - ‘जागतिक समाजाचा आत्मा आजारी पडला आहे की काय, असे वाटत असतानाच तरुण कलाकारांना दिली जात असलेली अभ्यासवृत्ती महत्त्वाची आहे. ती मिळालेल्या कलावंतांनी स्वतःची व्यावसायिक नीती ठरवून जगात चाललेला कला व्यवहार समजून घ्यावा,’’ असे चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सांगितले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’च्या वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. मयूरी अत्रे (संगीत), रोहन पवार (दृश्‍यकला), अदिती वेंकटेश्वरन्‌ (नृत्य) व प्रतीक जाधव (नाटक) या तरुण कलावंतांना अभ्यासवृत्ती देण्यात आली. प्रत्येकी दरमहा दहा हजार रुपये असे या अभ्यासवृत्तीचे स्वरुप असून, ती एक वर्षासाठी आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण भोळे, सेंटरचे अध्यक्ष दिलीप बोरावके तसेच प्रतीक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद काळे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 

मयूरीच्या गायनाला रसिकांची दाद
सुरवातीला मयूरीने मालकंस रागातील ‘करत है छेड़ नाद मोसे’ ही बंदिश, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘छंद तुझा मजला का मुकुंदा लावियेला’ हे जोत्स्ना भोळे यांनी गायलेले गीत व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी अजरामर केलेला ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. तिला अभिजित डिके (हार्मोनियम) व ओंकार पोळ (तबला) यांनी साथ केली. अदितीने सहकलाकारांसह ‘इन ट्रांझिट’ या नृत्यातून शहरातील घटनांचे प्रतिबिंब अभिव्यक्त केले. कथक व समकालीन नृत्याचा संगम साधलेली ही आशयघन कलाकृती अंतर्मुख करून गेली. सभागृहाबाहेर मांडलेल्या रोहनच्या शिल्पकृतींनाही रसिकांनी दाद दिली. हर्षद राजपाठक यांनी सूत्रसंचालन केले. वेदांत रानडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com