दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा संग्रह

उदय द्रविड हे त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांसह.
उदय द्रविड हे त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांसह.

एका संगीतवेड्या पोस्टमनने जुन्या काळात ग्रामोफोनवर अनेक दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा केलेला संग्रह आजही जिवापाड जपला आहे. पुण्यातील डेक्कन व कर्वे रस्ता परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना उदय द्रविड हे पोस्टमन आठवत असतील. त्यांच्या या छंदाची माहिती असणाऱ्या अनेक रसिकांनी आपल्या खजिन्यातील काही ध्वनिमुद्रिका त्यांना भेट दिल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द्रविड म्हणाले, ‘‘एकोणीसशे एक्केचाळीस ते पन्नास या दशकातील हिंदी चित्रपटांमधील अनवट गीतं माझ्या विशेष आवडीची आहेत. माझं वय आता पासष्ट आहे. पोस्टमन म्हणून तीस वर्षे नोकरी केली. पोस्टमन म्हणून घरोघरी टपाल द्यायला जायचो, तेव्हा लोकांशी थोडंफार बोलणंही व्हायचं. आतासारखं अतिशय खासगीपणा जपणारं वातावरण तेव्हा नव्हतं. माझं गाण्यांसंबंधीचं प्रेम एकाकडून दुसऱ्याला कळल्यावर तीही माणसं विचारपूस करायची. अशी खूप माणसं जोडली गेली. लोकांकडे ग्रामोफोनवर तबकडी फिरते आहे आणि तिच्यावरून मधुर गाणं ऐकायला मिळतं आहे, याचं प्रचंड आकर्षण निर्माण झालं. मीही ग्रामोफोन घेतला.

मोहम्मद रफी हे माझं दैवत. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका मी जमविल्या. त्यांच्या दुर्मिळ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका मिळवण्यासाठी अधूनमधून मुंबईतील चोरबाजारात जायचो. साताऱ्यात एकाकडे एकेका गाण्याच्या जास्तीच्या ध्वनिमुद्रिका असल्याचं कळल्यावर काही त्यांच्याकडून आणल्या. इतर काहीजणांनी भेट म्हणून दिलेल्या ध्वनिमुद्रिकांमध्ये वेगवेगळ्या गायकांच्या गीतांची भर पडत गेली. शास्त्रीय संगीतातील अमीरबाई कर्नाटकी व हिराबाई बडोदेकरांसारख्या दिग्गजांच्या ध्वनिमुद्रिका मिळाल्या.’’

द्रविड यांनी असंही सांगितलं की, शमशाद बेगम, नूरजहाँ व सुरैया यांची गाणी फार आवडल्याने ती जमवली. सुलोचना चव्हाण यांच्या मराठी लावण्याच लोकांना माहीत आहेत, पण एके काळी त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये गायलेली अप्रतिम गीतं माझ्या संग्रहात आहेत. रफीसाहेबांच्या पहिल्या सोलो गाण्याची ध्वनिमुद्रिका तर आहेच, पण त्यांनी अभिनय केलेल्या ‘लैला-मजनू’ व ‘जुगनू’ या चित्रपटांच्या डीव्हीडी आहेत. अनिल विश्वास, नौशाद, तलत मेहमूद यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गीतांविषयी मनमोकळ्या गप्पांचा योग आला. नौशाद यांनी त्यांच्या हस्ताक्षरात माझ्याकडील एका ध्वनिमुद्रिकेवर उर्दूत काही मजकूर लिहिला आहे.

एकदा नीलायम टॉकीज परिसरात माझी ड्यूटी असताना, लता मंगेशकर या एका ठिकाणी आल्याचं कळलं. शेजाऱ्यांपैकी कुणाला तरी मी लताबाईंची सही आणून द्यायची विनंती केली. निरोप आला की, तुम्हाला त्या बोलावत आहेत. सही तर त्यांनी दिलीच, पण माझ्या संग्रहाबद्दल बोलणंही झालं. त्यांचं पहिलं गाणं माझ्याकडे आहे. वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनातील ‘चिडियाँ बोले’ या गीताबद्दल आम्ही बोललो.  पुण्यात एकदा माधुरी एका कार्यक्रमासाठी आल्यावर मित्रांनी भेट घडवली. माझ्या 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com